संतोष देशमुख प्रकरणातील महिलेचा मृत्यू   

बीड : संतोष देशमुख यांना खोट्या प्रकरणात अडकविणार्‍या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.  
दमानिया यांनी सांगितले की, ही महिला मनीषा आकुसर, मनीषा बिडवे, मनीषा बियाणी, उघाडे, गोंदमे अशा पाच नावांनी वावरत होती. ती खोट्या चित्रफिती बनवून नागरिकांना अडकविण्याचे काम करत होती.  तिचा वावर  आडस, कळम, आंबे आणि रत्नागिरीपर्यंत होता. तिचा वापर करुन संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्रयत्न काही जण करत होते. 
 
या महिलेची पाच दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली.  बीडचे पोलिस कळंबमध्ये गेल्यानंतर घटना स्थानिक पोलिसांना कळाली.  दमानिया यांनी आरोप केला की महिलेची हत्या अनैतिक संबंधातून आणि पुरावे नष्ट करण्यासाठी झाली आहे. कळंबच्या द्वारकान येथील घरामध्ये महिलेची हत्या झाली आणि या घराला बाहेरून कुलूप लावले होते. दुर्गंधी आल्यानंतर रहिवाशांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी जागेवरच पुढील तपासणी केली. नंतर अंत्यविधी देखील करण्यात आला होता.
त्या म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी बीडच्या एका पत्रकाराने मला ही माहिती कळवली. मी ताबडतोब ती पोलिस अधीक्षकांना दिली.  
 

Related Articles